राजमा शेती : कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक 🌿🌱
गहू पेरणीला उशीर झाला आहे? काळजी करू नका! आता गहू पेरू नका—यावेळी राजमा पेरा आणि कमी खर्चात जास्त नफा मिळवा.”
आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीही राजमा शेतीचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.”
“राजमाची शेती साधारणपणे १२० दिवसांची असते.”
राजमा म्हणजेच हे डाळवर्गीय पीक आहे, पोषण मूल्यांनी भरपूर भरलेले असून आजकाल शहरी आणि ग्रामीण भागात त्याची मागणी सातत्याने वाढत आहे. योग्य पद्धतीने लागवड केली तर राजमा शेती शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न देऊ शकते.
राजमा हे प्रथिनांनी समृद्ध असलेले डाळवर्गीय पीक असून सध्या बाजारात याला चांगली मागणी आहे. सेंद्रिय पद्धतीने राजमा शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होतो आणि दरही जास्त मिळतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राजमा सेंद्रिय शेती हा एक फायदेशीर पर्याय ठरू शकतो.
सेंद्रिय शेतीसाठी जमिनीची तयारी:
शेवटच्या नांगरणीपूर्वी 10–12 टन कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट टाकावे, जीवामृत, घनजीवामृत वापर केल्यास जमिनीची सुपीकता वाढते, रासायनिक खतांचा वापर टाळावा
सेंद्रिय बियाण्याची निवड:
स्थानिक व रोगप्रतिकारक वाण निवडावेत, पेरणीपूर्वी बियाण्यावर बीजामृत प्रक्रिया करावी, त्यामुळे उगवण चांगली होते व रोग कमी होतात
पेरणीची योग्य वेळ व अंतर:
पेरणीचा काळ ऑक्टोंबर ते नोव्हेंबर
ओळीतील अंतर: 45 सें.मी.
रोपातील अंतर: 10–15 सें.मी.
बियाणे प्रमाण: एकरी 30–35 किल
पाणी व्यवस्थापन (सेंद्रिय पद्धत):
जास्त पाणी देऊ नये, 8–10 दिवसांच्या अंतराने हलके पाणी द्यावे,पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी
सेंद्रिय खत व पोषण व्यवस्थापन:
पेरणीनंतर 20–25 दिवसांनी जीवामृत फवारणी, फुलोऱ्याच्या अवस्थेत पंचगव्य फवारणी, सेंद्रिय खतामुळे उत्पादनासोबत मातीची गुणवत्ता सुधारते
कीड व रोग व्यवस्थापन (ऑर्गेनिक उपाय):
कीड नियंत्रणासाठी नीम अर्क / दशपर्णी अर्क वापरावा, बुरशीजन्य रोगांसाठी त्रायकोडर्मा उपयुक्तरासायनिक कीटकनाशक टाळावीत
काढणी व उत्पादन:
पीक 90–110 दिवसांत काढणीस तयार होते, शेंगा वाळल्यानंतर काढणी करावी, एकरी 8–12 क्विंटल उत्पादन मिळू शकते (सेंद्रिय पद्धतीने).
बाजारभाव व नफा:
सेंद्रिय राजमाला सामान्य राजमापेक्षा 20–30% जास्त दर मिळतो.खर्च कमी असल्यामुळे निव्वळ नफा चांगला मिळतो.थेट ग्राहक, सेंद्रिय बाजार, ऑनलाईन विक्रीचा फायदा घेता येतो
