पशुपालन कर्ज योजना 2025 : शेतकरी आणि पशुपालकांसाठी मोठी बातमी.

आजची ही महत्त्वाची बातमी थेट देशातील कोट्यवधी शेतकरी आणि पशुपालक कुटुंबांशी संबंधित आहे, जे आपल्या मेहनतीने आणि घामाच्या थेंबांनी देशाचा पोट भरण्याचे काम करतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, गावांमध्ये रोजगार निर्माण करणे आणि डेअरी क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.
पशुपालन कर्ज योजना 2025 काय आहे नेमक?
• पशुपालन कर्ज योजना 2025 ही ग्रामीण भागातील युवक, महिला, शेतकरी आणि बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी, कुक्कुटपालन तसेच संपूर्ण डेअरी प्रकल्प सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते.
•पशुपालनात कोणत्या व्यवसायांचा समावेश?
दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांचा समावेश.
•थेट लाभ कुणाला?
२५,००० मांसल कुक्कुट पक्षी, ५०,००० अंडी उत्पादक कुक्कुट पक्षी क्षमतेच्या तसेच ४५,००० क्षमतेच्या हॅचरी युनिटच्या कुक्कुटपालन व्यवसायास, १०० दुधाळ जनावरांचे संगोपन, ५०० मेंढी, शेळीपालन व २०० वराह या दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसायिकांना लाभ होणार आहे.
पशुपालकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर होणार असल्याने पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढून पशूजन्य उत्पादनात वाढ होईल. आर्थिक स्तर उंचावल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण निश्चित कमी होईल. शेतीप्रमाणे अनुदान, नुकसानभरपाई आता पशुपालकांना मिळणार आहे. त्यामुळे आता हा शाश्वत व्यवसायपणे सुरू होईल
• भारतामध्ये बहुतांश शेतकरी शेतीसोबत पशुपालन करतात आणि ही योजना त्यांच्या उत्पन्नात वाढ करणारा एक मोठा आधार ठरत आहे.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
• ₹10 लाखांपर्यंत कर्ज सुविधा
• 25% ते 35% पर्यंत सबसिडी (बँक व लाभार्थी प्रकारानुसार)
• ₹1.6 लाखांपर्यंत कर्जावर कोणतीही हमी लागत नाही
• ते 7 वर्षांपर्यंत परतफेडीची मुदत
•युवक, महिला शेतकरी व बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी
• या कर्जाच्या मदतीने दूध व्यवसाय, डेअरी युनिट, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय सुरू करता येतात.
• आवश्यक कागदपत्रे:-
•आधार कार्ड
•पॅन कार्ड
•ओळखपत्र (मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स)
•रहिवासी प्रमाणपत्र
•उत्पन्न प्रमाणपत्र
•जमीन कागदपत्रे किंवा भाडेपट्टा (लीज)
•बँक पासबुक व बँक स्टेटमेंट
•पशुपालन प्रोजेक्ट रिपोर्ट
•पासपोर्ट साईज फोटो
•मोबाईल नंबर.
• ऑनलाइन अर्ज कसा करावा?•
NABARD ची अधिकृत वेबसाइट उघडा•
👉 www.nabard.org
• होम पेजवर Dairy Entrepreneurship Development Scheme / Livestock Loan संबंधित माहिती शोधा.• आपल्या जिल्ह्यानुसार बँक शाखेची निवड करा
•अर्ज भरा व आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा.
•कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर कर्ज मंजूर होईल.
•कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
👉 ऑनलाइन अडचण असल्यास जवळच्या बँक शाखेत किंवा पशुसंवर्धन विभागात जाऊन अर्ज करू शकता.
• निष्कर्ष• जर तुम्ही डेअरी व्यवसाय सुरू करण्याचा किंवा पशुपालनामधून उत्पन्न वाढवण्याचा विचार करत असाल, तर पशुपालन कर्ज योजना 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. योग्य कागदपत्रे तयार करून आजच जवळच्या बँकेत अर्ज करा.
• शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे या दिशेने ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
🌾 शेतकरी – देशाची शान
•शेतकऱ्याचा घाम जेव्हा जमिनीत मिसळतो, तेव्हाच फळ-फुलं, अन्नधान्य आणि जीवन उगम पावते.• आन आहे, मान आहे, शान आहे – शेतकरी आहे!
